सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून शनिवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी लाडक्या गौरी अर्थात लक्ष्मीचे सोनियाच्या सोनपावलांनी गणरायांच्या भगिनिंचे मोठ्या उत्साहात आगमन आणि स्वागत सर्व वाव्हळ परिवाराकडून दणक्यात करण्यात आले केसनंद मधील सर्वात प्राचीन समजल्या जाणाऱ्या गौरी पूजनाचा वारसा आजही पांडुरंग व दशरथ वाव्हळ यांच्या परिवाराकडून पुढे प्रसाद व निरंजन वाव्हळ व अन्य परिवाराकडून पुढे चालविला जात आहे,
छाया,वनिता व अंकिता वाव्हळ यांनी काल परंपरेप्रमाणे गौरी आगमन केले व आज रविवार दि. 4 रोजी गौरीपूजन असून परिसरामध्ये ठीक ठिकाणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम तसेच सजावटीसाठी विविध बक्षिसांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे तसेच भजन प्रवचन किर्तन असे अनेक कार्यक्रम ठीक ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत अनेक ठिकाणी सामाजिक पारंपारिक धार्मिक संदेश देणारे देखावे सुद्धा तयार करण्यात आले आहेत परंपरेप्रमाणे प्रथम भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विविध फराळांचे पदार्थ बनवून गौरीना दाखवण्याची परंपरा आहे त्यानंतर विविध फळे फुले खाद्यपदार्थांची आरास तसेच लाईटच्या माळांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे अनेक महिलांनी देखावे सादर केले आहेत त्यानिमित्त आज सर्वत्र गौरीपूजनाचा उत्साह ओसंडून वाहत आहे उद्या दिनांक पाच रोजी गौरी विसर्जन होणार आहे


