सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता हवेली) गावचे माजी उपसरपंच शांताराम बापू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार कार्ड व सुकन्या समृद्धी योजना तसेच अवघ्या 399 रुपयामध्ये 10 लाखांचा अपघाती विमा या योजनांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.
भारतीय डाक विभागाच्या अनेक योजना अत्यंत लाभदायक व किफायतशीर अशा आहेत. या सुविधांचा सामान्य जनतेला सहजरीत्या लाभ मिळावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी जनतेचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. आधार कार्ड काढणे वा दुरुस्तीसाठी जनतेला बरीच पायपीट करावी लागते. प्रसंगी यातून लोकांना मानसिक त्रास तर होतोच परंतु आर्थिक लुटमारीलाही सामोरे जावे लागते. याच जाणिवेतून जनतेच्या या आघाडीच्या आणि गरजेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा हेतू या मेळाव्यात उत्तमरित्या साध्य झाला. सुमारे 130 पेक्षाही जास्त लोकांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करुन घेतला. दिडशेच्यावर लोकांनी नवीन आधार काढणे वा दुरुस्ती या सेवेचा लाभ घेतला.
तसेच सध्या तुफान लोकप्रिय होत असलेली योजना म्हणजे केवळ वार्षिक हप्ता 399 रुपयांमध्ये दहा लाखांचा अपघातविमा काढणे..! सुमारे दोनशे लोकांनी याही सुविधेचा लाभ घेतला. एकंदरीत पाचशेच्यावर लोकांच्या आधार कार्डशी निगडित असलेल्या समस्या यशस्वी रित्या सोडविण्यात बापूंना यश आले.
या मेळाव्यासाठी भारतीय डाक विभागाचे (पूर्व विभाग) पब्लिक रिलेशन ऑफीसर मा. गणेशजी खेडकर , आधारचे ऑपरेटर श्री. सौरभ जैस्वाल, संतोष भरेकर, तसेच मोबाईल नंबर लिंकसाठी व अकाऊंट ओपनिंगसाठी अमित नागने, पॉलीसी काढण्यासाठी, पांडुरंग आनंदे आणि सुकन्यासाठी पोस्टमन नामदेव गवळी या सर्व अधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

