March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
        दि . १४ रोजी रात्री शिरूर गावचे हद्दीत मुंबई बाजार येथील श्री दत्त इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल शॉपी दुकानाचे रात्रीच्या वेळी शटरचा कोंडा तोडुन अज्ञात चोरटयांनी दुकानामधील ७ मोबाईल व ३०,००० / – रु . रोख रक्कम असा एकुण ४७,२५० / – रु . किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला .  

त्या अनुशंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे ऋषीकेश सदाशिव कारखिले वय २७ वर्ष , रा . राळेगण थेरपाळ , ता . पारनेर , जि . अहमदनगर यांचे फिर्यादीवरून गु.र.नं. ६२० / २०२२ भा.दं.वि.क. ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन घटनास्थळाजवळील सी.सी.टी.व्ही . फुटेज चेक करून त्यामधील फुटेजद्वारे आरोपीतांची ओळख पटवुन त्यांना शिरूर येथुन शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडुन गुन्हयातील चोरून नेलेले ७ मोबाईल त्यांचे राहते घरातुन जागीय ताब्यात घेतले . अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नाव १ ) महावीर नुराराम वय १ ९ वर्ष , २ ) बलराम उर्फ बल्ला काठात रामलाल वय १ ९ वर्ष रा . टेवंडा ता . जयतारा , जि.पाले , राज्य राजस्थान सध्या रा . प्रवारमळा , शिरुर , ता . शिरूर , जि . पुणे असे असुन त्यांना रिमांडकामी मे न्यायालयात हजर केले असता मे . न्यायालयाने सदर आरोपीतांची ०४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पो . ना . २४ ९९ टेंगले करीत आहेत .

सदर गुन्हयाची उकल मा . पोलीस अधीक्षक अभिनय देशमुख सोो , मा . अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे से , पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी सोो , शिरूर यांचे मागदर्शना खाली पो.नि. सुरेशकुमार राऊत , शिरूर पोलीस ठाणे , पोसई अभिजीत पवार , पो . हवा . परशुराम सांगळे , पो.ना. नाथसाहेब जगताप , पो.ना.नितीन सुद्रिक , पो.ना. बाळु भवर , पो.कॉ. प्रविण पिठले , पो.कॉ. राजेंद्र गोपाळे यांनी केलेली आहे . शिरुर परिसरातील नागरिकांना या घटनेवरून आव्हान करण्यात येते की , वरीलप्रमाणे पकडलेले आरोपी बाहेर राज्यातून काही दिवस शिरूर परिसरात भाडयाने राहण्यास आलेले होते . त्यांनी शिरूर परिसराची पाहणी करून चोरी करण्याकरिता मोबाईल शॉपीची निवड करून सदरचा गुन्हा केलेला आहे . त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागरूक राहून आपले अवतीभोवती नविन राहण्यास आलेल्या नागरिकांची चौकशी करावी व काही संशयास्पद वाटल्यास शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,