March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी 
            लोणी काळभोर येथील ग्रामसेवकाने/ग्रामविकास अधिकारी आपल्या आधिकराचा गैरवापर करत लोकशाही चा आवाज दाबण्याचा प्रयत्न  केला आहे.दि. 16 एप्रिल रोजी दै. लोकमंथन या वृत्त पत्रात लोणी काळभोर चे प्रतिनिधी अनिकेत अंकुश मुळीक यांनी ,गावातील पिण्याच्या पाण्याच्या  टाक्या न धुतलेल्याच पाणी अस्वछ अशी बातमी प्रकाशित केली होती.

            दरम्यान याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काही नेते मंडळींनी ग्रा.पं लेटर हेड घेत, हि बातमी खोटी आहे. असा आरोप करत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तसेच फेसबुक वर देखील बातमीदार व प्रतिनिधी ( पत्रकार) यांचेवर कारवाई करा..असे पोस्ट केले होते..या विषयी  पत्रकार व बातमी देणारे यांनी गावातील बौद्ध वस्ती या ठिकाणी खरंच पाणी अस्वच्छ व असल्याचे सत्य समोर आल्याने 19 एप्रिल रोजी   ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता.यात ग्रामसेवकांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता आले नसून कबूल ली देत ,अस्वच्छ पाणी समस्या लवकरच दूर करत पाणी पुरवठा कर्मचारी यांना लेटर द्वारे कळवण्यात आले होते.

            पत्रकार यांचे वडील हे पाणी पुरवठा कर्मचारी असून त्यांनी बातमी  प्रकाशित का? केली. तसेच तुला आम्ही कामावर ठेवणार नाही ,मुलाला समजून सांग,असा सज्जड दम देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच तुझा कामात हलगर्जी पणा आहे.असे खोटे आरोप करत कंप्लेंट लेटर दिले आहे.तसेच राहत्या घराला कुलूप लावत हे ग्रामपंचायत मालकीचे आहे. याचे भाडे 7 दिवसात जमा करावे.असे लेटर देत परस्पर पगारातून पैसे कट केले असून. पत्रकाराने पुन्हा बातमी देऊ नये या साठी ,तसेच लोकशाही पेक्षा सत्ता मोठी आहे .हे दाखवण्याचा मिश्किल प्रयत्न केला आहे.
*लोकशाही दाबण्याचा प्रयत्न..* 
1)गावामध्ये ज्या परिसरात गढूळ अस्वछ पाणी येत आहे. त्या पाणी पुरवठा कर्मचारी यांना कुठलेही कंप्लेंट लेटर देण्यात आले नसून अधिकाऱ्याने पदाचा गैर वापर करत पत्रकाराचे वडील यांनाच कंप्लेंट लेटर दिले आहे.
2) राहत्या घराला कुलूप लावत बातमी प्रकाशित का? केली म्हणून सुड भावनेने घराला कुलूप लावले असून, परस्पर पगारातून पैसे काढून घेतले आहे.
3)गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बऱ्याच इमारती ,दुकाने ,हद्दीतील जागा तसेच शेजारी राहणारे कर्मचारी  यांना देखील कुठलेही लेटर दिले नाही.
 
4) संविधानिक पदाचा तसेच लोकशाही दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकरणी राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघ गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे कारवाई करणार आहे.
 *काय आहेत ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी यांचे अधिकार कार्य व कर्तव्य* 
कार्य –
संबधित गावांकरिता पाणीपट्टी , घरपट्टी इ. करांची वसूली करणे. ग्रामपंचायतीच्या सभा, व ग्रामसभांना वेळोवेळी उपस्थित राहून इतिवृत लेखन केले पाहिजे. याशिवाय विस्तार अधिकार्यांच्या सल्ल्यावरुन ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी गावात इतर योजनांची माहिती देतो व त्यासंदर्भात अंमलबजावणी करणे.
कर्तव्य: – 1) प्रत्येक शासकीय कर्मचारी नितांत व सचोटी राखील 2)कर्तव्यपरायता ठेवीन आणि अशोभनीय असे कुठलेही काम करणार नाही.3) संविधानाचे सर्व श्रेष्ठत्व ठेवीन व लोकशाहीचे मुल्ले याबद्दल वचन बद्ध राहील.4) कर्तव्य पार पाडीत असताना गुणवत्ता औचित्य व निःपक्ष पातीपणा या तत्त्वांचे अनुसरण करेन.5)उत्तरदायित्व व पारदर्शकता ठेवीन लोकांप्रती विशेषतः दुर्बल घटकांनप्रती प्रतिसादी असेल.
 *ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी निलंबनाचे ‘बीडीओं’ना अधिकार* 
1) ठपका ठेवणे
2) पदोन्नती रोखून ठेवणे
3) निष्काळजी पणामुळे आदेशाचे भंग केल्यास व आर्थिक हानी झाल्यास पगारातून वसूल करणे.4) फौजदारी गुन्हा दाखल करणे
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमिता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधी अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्ताऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने जबाबदार व्यक्तिंविरुद्ध फौजदारी गुन्हा तत्काळ दाखल करावा, संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवून घेण्यास टाळाटाळ न करता ते तत्काळ नोंदवून घेण्यात यावेत, ग्रामपंचायत निधीच्या अपहाराबाबत जबाबदार असणाऱ्या व्यक्तिंविरोधात ठोस कारवाई करण्यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या करणाऱ्या अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाविषयक कारवाई करावी असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे यापुढील काळात ग्रामपंचायत पातळीवर आर्थिक गैरव्यवहार कमी होतील असे मानले जाते,
पत्रकारांवर होणारा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही,अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेवर तसेच पत्रकारांवर खोटे आरोप व गुन्हे दाखल करणाऱ्या अशा शासकीय कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे जनतेची सेवा करणे याचा विसर जर अशा जबाबदार व्यक्तीला पडला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील यांनी सांगितले,