March 30, 2026
सातारा प्रतिनिधी
              मानद पशुकल्याण अधिकारी अभिषेक मुळे यांना त्यांच्या माहीतीदाराने फोनवरुन एक गोरक्षणा संदर्भातली एक बातमी दिली की, जयपुर ता. खटाव जि. सातारा येथुन एक ट्रक MH 11 AL 5445 या गाडीतुन खुप म्हशींना घेवुन कत्तलीसाठी कोंढवा, पुणे येथे जाणार आहे अशी माहीती मिळाल्यानंतर मुळे व इतर गोरक्षक जयपुर येथे दबा धरुन गाडीची वाट पाहत बसले व दुपारी १२ च्या सुमारास ती गाडी जयपुर येथे आल्याचे निदर्शनास आले,

              त्यानंतर वरीष्ठ पोलिस अधिकारी शिवाजीराव विभुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने पोलिस मदत देवुन त्यांच्या मदतीने ती गाडी पकडुन सर्व चौकशी करुन ती गाडी रहीमतपुर येथील पोलिस स्टेशनला आणण्यात आली त्यामध्ये म्हैसुर जातीच्या १७ म्हशींना अतिशय दाटीवाटीने भरण्यात आल्याचे दिसुन आले. व प्राणी संरक्षण कायदा १९६० व प्राणी वाहन परवाना या कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करुन सदर सर्व प्राणी दहीवडी येथील गोशाळेत सोडण्यात आले.

              मानद पशुकल्याण अधिकारी अभिषेक मुळे यांची या प्रकरणात प्रमुख भूमिका होती. कसायांनी दबाव टाकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या अनेक पुढाऱ्यांचा उपयोग करून अभिषेक मुळे यांच्यावर दबाव आणला परंतु कोणत्याही दबावा समोर न जुमानता मुक्या जनावरांचे प्राण वाचवण्याच्या बाबतीत अभिषेक मुळे ठाम राहिले.

             कोरेगाव पोलीस स्टेशनच्या गोवंश रक्षणाच्या संदर्भात कारवाई करण्यात नेहमी टाळाटाळ करते. गोरक्षणांना झिटकारून लावण्याचे अनेक प्रकार या पोलिस स्टेशनमध्ये घडले आहे. परंतु अभिषेक मुळे आणि त्यांचे सहकारी यांनी ही परंपरा मोडीत काढली.

या गोरक्षणाच्या कार्यात.अजयदादा बर्गे,.ओंकारदादा माने,.मयुरदादा परदेशी व.ओमदादा शिरवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले..तसेच. अभिषेक मुळे यांच्यासमवेत असलेल्या.शुभमदादा तळेकर, .श्रावणदादा सुतार व वेदांग कानडे.अथर्वदादा सुतार या सर्व गोरक्षकांनी या कारवाई दरम्यान मोठी मेहनत घेतली. या सर्वांचे अभिनंदन. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी.शिवाजीराव विभुते आणि त्यांचे सहकारी याचे अभिनंदन करण्यात आले,
राज्यात जनावरांची कत्तल आढळल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,
मानद पशुकल्याण अधिकारी, अभिषेक मुळे
संपर्क क्र – 7028954027

तुम्ही आम्हांला प्रतिदिन एक रुपया द्या.
आम्ही तुम्हाला गोहत्यामुक्त हिंदुस्थान देऊ !

मिलिंद रमाकांत एकबोटे
गुगल पे/फोन पे नं.- 9011832711
प्रमुख संयोजक
आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान

तुम्ही आम्हांला रद्दी द्या,आम्ही गोमातेला चारा देऊ !!
संपर्क क्र. – 8605840580/9823715810