March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
       दिनांक – ०६/०९/२०२२ मुंढवा पोलीस स्टेशन,पुणे शहर वयोवृदध महीलेचा तीच्या मुलाने व नातवाने कट रचुन केला खुन,
माणुसकीला काळीमा फासणारी घटना            

   वयोवृदध महिला श्रीमती उषा विठ्ठल गायकवाड, वय ६२ वर्षे, रा.स.नं. ३७, म्हसोबा नगर, केशवनगर ,मुंढवा पुणे हया दि.०५/०८/२०२२ रोजी हरवलेबाबत त्यांचा नातु  साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं.३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे यांनी मुंढवा पोस्टे येथे मिसींग कंप्लेंट १०/०८/२०२२ रोजी तक्रार दिलेली होती. सदर मिसींग प्रकरणातील मिसींग महिला श्रीमती उषा विठ्ठल गायकवाड, वय ६२ वर्षे, यांचा शोध मुंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत होते.

वर नमुद मिसींग वयोवृदध महिला यांची मुलगी.शितल मनोज कांबळे रा.साठेवस्ती लोहगाव पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं.३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे व त्याचे वडील  संदीप विठठल गायकवाड वय ४२ वर्ष रा.गुरूकृपा सोसायटी लक्ष्मी इन्क्लेव्ह रूम नंबर २०२ केशवनगर मुंढवा यांनी कट करून, सदर मिसींग महीलेचे अपहरण करुन तीच्या जीवाचे बरे वाईट केले असावे. अश्या प्रकारची तक्रार दिलेने त्यांचेविरूध्द मुंढवा पोस्टे येथे  ३६४(अ),३६४ १२०(ब),३४ प्रमाणे दि.२८/०८/२०२२ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
– नमुद गुन्हयामधे दिनांक २८/०८/२०२२ रोजी, अपहरण केलेल्या वयोवृदध महीलेचा नातु साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं.३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे व दिनांक ३०/०८/२०२२ रोजी, महिलेचा मुलगा संदीप विठठल गायकवाड वय ४२ वर्ष रा.गुरूकृपा सोसायटी लक्ष्मी इन्क्लेव्ह रूम नंबर २०२ केशवनगर मुंढवा यांना अटक केली आहे.सदर आरोपी यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.चेतन जगताप साो.यांनी दि.०७/०९/२०२२ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
दाखल गुन्हयातील पोलीस कस्टडी रिमांडमधील आरोपी साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष याचेकडे केलेल तपासामधे, त्याने तो रहात असलेले घर व सोन्याचे दागिने हे त्याची आजी श्रीमती उषा विठठल गायकवाड याचे नावे आहे. सदर उषा गायकवाड या त्यांना वेळावेळी घर सोडुन जाणेस सांगत असे. त्यामुळे चिडुन जावुन आरोपी साहील ऊर्फ गुडडु गायकवाड याने दि.०५/०८/२०२२ रोजी त्याची आजी नामे उषा गायकवाड वय ६२ वर्ष या घरात झोपले असताना, त्यांचा गळा व तोंड दोन्ही हाताने दाबुन त्यांना जिवे ठार मारले आहे.नंतर पुरावा नष्ट करणेचे व पोलीसांना दिशाभुल करणेचे उददेशाने उषा गायकवाड या वापरत असलेला मोबाईल फोन हा कासेवाडी येथे गादीखाली ठेवला होता. नंतर मंगळवार पेठ येथुन झाड कापणेचे इलेक्ट्रिक कटर मशिन विकत घेवून, घरी येवुन त्याची आजी उषा गायकवाड हिस बाथरूममधे ओढत नेवुन तीचा शरीराचे इलेक्ट्रिक कटर मशिनने तुकडे केले व ते तुकडे पोत्यात भरुन तो वापरत असलेल्या वेस्पा दुचाकी गाडी व चारचाकी स्वीफट गाडी यामधे भरून, प्रथम केशवनगर येथील जॅकवेल/कचरा डेपोचे मागील बाजुचे मुळा मुठा नदीपात्रावरील नदीत टाकले.तसेच थेऊर येथील नमुद नदीचे पुलावरून वाहत्या पाण्यात टाकले होते. नंतर घरी येवुन कटर मशिन व रक्ताने भरलेले कपडे हे मांजरी येथे नदीचे पात्रात वाहत्या पाण्यात टाकले होते.
दि.२३/०८/२०२२ रोजी थेऊर जवळील वाडेगाव येथे एक मानवी उजवा पाय मुळा मुठा नदीचे कडेला मिळाला होता. त्याबाबत लोणीकंद पोस्टे पुणे येथे अकस्मात मयत प्रकरण नंबर १७५/२०२२ अन्वये दाखल आहे.
___ आज रोजी पर्यंत केलेले तपासामधुन,साक्षीदार व शास्त्रीय पुरावे वरून यातील आरोपी यांनी उषा गायकवाड यांचा खुन केला असलेचे निष्पन्न झाले आहे.म्हणुन सदर गुन्हयामधे  ३०२ व २०१ या कलमाचा जादा अंतर्भाव केला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे .नामदेव चव्हाण,पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे श्रीमती नम्रता पाटील मॅडम,सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग .बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोस्टेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे,सहा.पोलीस निरीक्षक समीर करपे, पो उप निरीक्षक धनंजय गाडे, पो उप निरीक्षक अविनाश मराठे, पोलीस अंमलदार संतोष जगताप, राजु कदम, वैभव मोरे, दत्ताराम जाधव, महेश पाठक अमोल चव्हाण दिनेश भांदुर्गे, सचिन पाटील, योगेश गायकवाड, राहुल मोरे,निलेश पालवे, सारूक,यांनी केली आहे.