March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
       तत्वनिष्ठा, कष्ट , व सातत्यानेच जिवनामध्ये यश  मिळते असे विचार सविंदणे (ता .शिरूर) येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील सर्वं क्षेत्रातील गुणवताधारक विद्यार्थ्यांचे सत्कार प्रसंगी बोलताना भरत पडवळ यांनी व्यक्त केले . कोरोना मुळे दोन वर्ष यशस्वी छात्रांचा गौरव करणे राहीले होते , तो व संस्थेच्या वर्धापन दिनानिमीत आयोजीत सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना त्यांनी मुलांना मोबाहिलचा गैरवापर करू नये असे आवाहन केले .  

खेळ, रांगोळी , चित्रकला ,निबंधलेखन स्पर्धांत विजेत्या छात्रांना मान्यवरांचे हस्ते कंपास ,पॅड लीडपेन आदी बक्षीस वितरन उपस्थीत मान्यवरांचे हस्ते केले .सर्व क्षेत्रात प्रथम, द्वितीय , तृतीय .क्रमांक प्राप्त विधार्थ्यांना   बक्षीसे देणेत आली . पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे संस्थापक बाबुराव घोलप यांचे तैलचित्र बनविलेल्या संकेत शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना दोन हजारावर रोख रक्कम बक्षीसेही देणेत आली .  

यावेळी  सरपंच सोनाली खैरे, ग्रा. सदस्या शुभांगी पडवळ ,नंदाताई पुंडे, मनिषा नरवडे, वढूचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, ज्यु. कॉलेजचे सचिव बाळासो पडवळ, भरतशेठ पडवळ,प्राचार्य पुंडेसर , पी.डी . नरवडे गुरुजी, कोकडे सर, तंटामुक्ती अध्यक्ष पोपटभाऊ शिंदे, आप्पासो नरवडे, बाळासो लंघे, संभाजी नरवडे , मधुकर पडवळ , माजी चेअरमन फकीरा लंघे , बाळासो लंघे , दत्तात्रय नरवडे आदी मान्यवर उपस्थीत होते . प्रास्तावीकात महामुनी सरांनी संस्थेच्या कार्याचा सखोल आढावा घेतला .

यात्रा कमिटीचे गावाने एक लाख हायस्कुलसाठी दिले व सिताबाई नानासाहेब पवार यांचे स्मरनार्थ हरी ,  दत्तात्रय , विठ्ठल या मुलांनी ५००१ रुपये संस्थेस दिल्‍याने आभार व्यक्त केले .शिक्षकांचे पगारासाठी निधीची व्यवस्था गावाने करावी, ही भावना सचिव बाळासो पडवळ यांनी व्यक्त केली . कु. इचके गौरी विठ्ठल व लंघे ईश्वरी वैभव या विद्यार्थीनींनी आपले भाषणात संस्था संस्थापक घोलप यांचे विषयी प्रभावी विचार मांडले . चित्रकला स्पर्धेत पिंजारी वजीर , यशवंत सुभाष, निबंध लेखनात नवनाथ रायकर , साक्षी ईचके , रांगोळीत दिप्ती डांगे , नवनाथ रायकर , वक्तृवात ईश्वरी लंघे, गौरी इचके व ५ वी ते १२वी तील विराज भोर , संतोष गायकवाड , दिनेश झेंडे , सुनिल लांघे, निवृत्ती नरवडे , दतात्रय पडवळ, सोमनाथ खाडे, शुभम नरवडे, सुर्यकांत पोखरकर , गणेश माकर , अफजल ईनामनार , ओंकार मिडगुले , पुनम इचके, सुंदर जगदाळे आदी विद्यार्थ्यांना भरतशेठ व मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करणेत आले . मुख्याध्यापक पुंडे यांनी ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या