लोणी काळभोर अनिकेत मुळीक
मध्यप्रदेशातील चोरट्यांची टोळी रिक्षातून दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्यानुसार खडकीतील दारूगोळा कारखान्यापासून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला.
अंधारात चोरट्यांबरोबर असलेले दोन साथीदार पसार –
या भागात एक रिक्षा आढळून आली. रिक्षाचालक आरडेची चौकशी करण्यात आली. रिक्षाची तपासणी करण्यात आली. तेव्हा रिक्षाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत कोयते, कुऱ्हाड आढळून आली. पोलिसांनी पवार, पारधी, राजपूत यांना पकडले व शस्त्रे जप्त करण्यात आली.
अंधारात चोरट्यांबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, सारस साळवी आदींनी ही कारवाई केली.


