March 30, 2026
सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
      स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद जोपासणारे तसेच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करणारे शिक्षणमहर्षी, कर्मवीर,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-लोकनेते आदरणीय भाऊराव पाटील यांच्या जयंती महोत्सवानिमित्त कासुडी॔ टोलनाका व खामगाव गाडामोडी चौकात समाजसेवक भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,   

यावेळी कासुडी॔ व गाडामोडी चौकात जयंतीनिमित्ताने अपंग जगताप भाऊ व्यक्तींच्या हस्ते वॄक्षरोपण  करण्यात आले, त्यावेळी उत्तमराव सोनवणे, विठ्ठलराव बर्वे, सामाजिक कार्यकर्ते उमेशभैय्या म्हेत्रे, नाना जगताप, पोलिस पाटील भिसे मॅडम, संजयजी जगताप, रसूल मुलाणी,सागर सोनवणे, दळवी मामा, डॉ खेडेकर तसेच भरपूर मान्यवर उपस्थित होत  त्यावेळी उमेशभैय्या म्हेत्रे म्हणाले भाऊराव पाटील यांच्या शिक्षणसंस्थांमुळे बहुजनांची मुलें सरकारी अधिकारी झाली आहे, तसेच भाऊराव पाटील वारंवार बोलत असे माझ्या दाढीच्या केसां एवढ्या शिक्षण संस्थां काढून बहुजनांची मुलें शिकवून मनुवादयाचया छाताडावर थयाथया नाचवील असे ठणकावून सांगत होते. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते उमेशभैय्या म्हेत्रे व रसूल मुलाणी यांनी केले होते तसेच आभार विठ्ठलराव बर्वे यांनी मानले,