नुकत्याच येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूक रणधुमाळी मुळे चांगलेच वातावरण तापले असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी, तसेच वार्डानुसार सदस्य पदासाठी उमेदवार आमने-सामने चांगलेच भिडलेले आहेत, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये निवडणुकीने वातावरण चांगलेच गरम झाले असून चांगल्या प्रकारचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने जोर लावला आहे, जोरदार प्रयत्न असलेल्या प्रत्येक उमेदवार तसेच मतदाराची पार झोप उडाली आहे, येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आता कालावधी देखील कमी राहिला आहे, त्यामुळे राहिलेल्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचून आपणच कसे योग्य आहोत, हे दाखवून देण्याची जोरदार स्पर्धा शक्ती प्रदर्शनातून रात्रीचा दिवस करत प्रत्येक उमेदवारामध्ये गावभेट, वार्डभेट दौरा जोरदार चालू आहे, दांडगा जनसंपर्क, विकास काम करण्याची कौशल्य, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक बाजू भक्कम अशा उमेदवारांना संधी मिळणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,

