March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकांत दुंडे
       मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवारची सुट्टी  आल्याने भाविकांनी श्री चिंतामणी दर्शनास पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.पहाटे मकरंद आगलावे यांनी श्रींची पूजा केली.चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली.

देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिर परिसरात मंडप घालण्यात आला होता.मंदिराच्या आत व बाहेर दर्शन बारीची सोय करण्यात आली होती.मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती.सायंकाळी हभप नारायण महाराज खंदारे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. चंद्रोदय नंतर श्रींचा छबीना निघाला त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने तसेच विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी मंदिरातील शांतता सुव्यवस्थेची जबाबदारी चोख पार पाडली.हभप आनंद महराज तांबे व मंगलमूर्ती पोफळे हे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते.