याअंतर्गत गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाय योजना राबविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कलापथकाची निर्मिती केली असून कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.पुरंदर मधील माळशिरस, हिवरे व दिवे ग्रामपंचायत मध्ये जय मल्हार कला मंच या कला पथकामार्फत २५ ते २७ जुलै या कालावधीत जनजागृती बाबत कार्यक्रम घेण्यात आले. सदर गावांमध्ये भूजल पातळी कमी झाल्यामुळे या गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाय योजना घेण्यात आल्या. मल्हार कला मंच पुणे या कलापथकामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात आले मनोरंजन आणि वेगवेगळया गीतांच्या माध्यमातुन लोकसहभागीय अटल भुजल योजनेविषयी, भूजल बचतीचे महत्व, पाण्याचे महत्व, विहीर पुर्णभरण, ठिबक व तुषार सिंचन, भुजल पातळीमध्ये घसरण दरामध्ये सुधारणा करणे, ग्राम पंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे व जलसुरक्षा आराखडयाची प्रभावी अंमलबजावणी तसेच भूजल पातळी इत्यादी बाबत जनजागृती करण्यात आली.वरिष्ठ भू वैज्ञानिक संतोष गावडे व सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांच्या मार्गदर्शना नुसार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या शुभांगी काळे, दर्शन साठे व राकेश देशमुख यांच्या सहकार्यातून पथनाट्याद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. ग्रामपंचायतचे सरपंच, ग्राम सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिना भूजल पातळी बाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.

