६६ उतीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५७ जनांना ४ वर्ष एकूण ४८ हजार स्कॉलरशिप मिळणार असलेचे प्रा . घोडके यांनी प्रास्ताविकात सांगून पाचुंदकर यांचेकडून हायस्कूल साठी मदतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या . यावेळी सरपंच अश्विनी धुमाळ , माजी सरपंच संदिप सुरसे, सदाण्णा धुमाळ , माजी चेअरमन शहाजी जाधव, सोसायटीचे संचालक माऊली धुमाळ , कैलास धुमाळ , एकनाथ झेंडे, दतात्रय धुमाळ, बापुसो धुमाळ, सैनिक संघटना ध्यक्ष तुकाराम डफळ , माजी सरपंच अमोल भरणे , विशाल धुमाळ , रमेश धुमाळ , किसन पलांडे , चंद्रकांत धुमाळ, आप्पासो धुमाळ , अण्णासो धुमाळ, विकास धुमाळ , विक्रम धुमाळ ,प्रकाश धुमाळ , माजी उपसरपंच राजेंद्र धुमाळ , सुभाष धुमाळ, ARN न्युजचे संपादक सुर्यकांत शिर्के उपस्थीत होते .
पाचुंदकर व मान्यवरांचे हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देवून ५७ विद्यार्थी व मार्गदर्शक बोराटे सर, कल्यान कडेकर , निलेश धुमाळ व सर्व शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करणेत आला, .मनोज नायकोडी सर यांनी स्वागत केले . माजी सरपंच रमेश धुमाळ यांनी मानसिंग पांचुदकर यांचे कडून कंपन्यांच्या CSR फंडातून शाळा इमारत व इतरही मदतीची अपेक्षा व्यक्त केली . जाईभाई सर यांनी आभार मानले .


