गावडेवाडी- प्रतिनिधी मिलिंद टेमकर .
वृक्षारोपणाचे महत्व लक्षात घेउन भोरवाडी खंडोबा मंदिर परिसर आणि बैल गाडा घाट व बैलगाडा घाट तळे अवसरी खुर्द (तालुका आंबेगाव) या ठिकाणी 1996 दहावी ची संपूर्ण ब्याच आणि अवसरी खुर्द ग्रामस्थांच्या सहकार्यातून वृक्षारोपण करण्यात आले.
या मध्ये देशी 200 वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ,कडुलिंब, जांभुळ, चिंच,करंज, बेल,उंबर, आवळा,सप्तपर्णी इत्यादी अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी ऋणानुबंध परिवार , अवसरी ग्रामस्थांनी घेतली. तसेच बैलगाडा संघटना व बैलगाडा मालक यांनी घेतली आहे.अवसरी ग्रामपंचायतीने कुर्हाड बंदी घातली आहे.यात फक्त काटेरी झाडे झुडपे सोडून इतर झाडाच्या खोडापासून झाडे तोडण्यार्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.अशी सूचना या वेळी देण्यात आली, तब्बल 26 वर्षाने या बॅचमधील उपस्थित यांना पुन्हा वर्ग भरला असे वाटत होते, गेले कित्येक वर्षे विखुरलेले 1996 च्या बॅचचे विद्यार्थी खूप वर्षांनी एकत्र आल्याने प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहत होता,

