यावेळी उपशाखा प्रबंधक प्रज्ञा म्हात्रे मॅडम,उपशाखा प्रबंधक रसिका सानकर मॅडम,उपशाखा प्रबंधक अनिकेत यादव सर,उपशाखा प्रबंधक विजय भुतेकर सर, सहाय्यक व्यवस्थापक विजय थोरात सर,बँकेतील अधिकारी कल्पेश म्हात्रे सर,अनामिका मालुसरे मॅडम,शुभम ढगे सर,रोहित चांदवेकर सत, अभिजित एरुमकर सर,अविनाश गावंड सर,संजय गावंड सर, ललित पाटील सर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक व्यवस्थापक बालाजी आवरगंड सर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की,बँकेत रुजू झाल्यापासून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात काम करत असताना तीन वर्ष कसे निघून गेले समजले नाही.त्यावेळी तत्कालीन शाखा व्यवस्थापक महेश कुरलेवार सर यांनी भरपूर सहकार्य केले.प्रत्येकाशी काम करत असताना आलेला संबंध खूप महत्वाचा होता,यामुळे भरपूर काही शिकता आले,हे शिकत असताना एवढे वर्ष निघून गेले पण या पेण शाखेत घरगुती वातावरण असल्यामुळें घरापासून एवढ्या दूर असल्याचं कधी काही वाटलं नाही.पेण तालुक्यासह अन्य पाच तालुक्यात काम करत असताना ओम साई प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र अलिबाग यांच्या सोबत महिला बचत गटाचे काम करताना देखील व्यवस्थापक, सहयोगिनी,प्रेरिका,लेखापाल यांचे देखील सहकार्य लाभले.
सहाय्यक व्यवस्थापक कुणाल राजपूत सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्यावेळी आयसीआयसीआय बँक शाखा पेण मध्ये चालू झाली त्यावेळेस पासून बँकेत मुलाखत देऊन रुजू झालो ते आजतागायत अनेक अधिकारी लोकांशी संपर्क आला,सर्वांनी समजून घेऊन नेहमी मदतीची भावना दाखवली.तत्कालीन शाखा व्यवस्थापक महेश कुरलेवार सर यांनी खूप मदत केली,बँकेतील ज्या गोष्टींची जादा माहिती नव्हती त्या अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या.बँकेतील सर्वांशी प्रेमाने वागत अनेक अनुभव सांगितले पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूचे अनावर लपू शकले नाही.



