यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी शंभू वंदना, समाधीच्या पूजनाने निषेध सभेची सुरुवात झाली, लोकनेत्यांच्या धर्मवीर शंभुराजे, हिंदू धर्म, देव- देवतांवर चुकीच्या वक्तव्यावर आता हिंदू लोक पेटलेली असून, संबंधित लोक नेत्यांविषयी राग व संतापाची लाट मनात उसळी आहे, अशा स्वरूपाचे वक्तव्य आणि स्पष्ट मत उपस्थतांनी व्यक्त केले आहे, यावेळी आंदोलनाचे नियोजन सकल हिंदु समाज श्री तिर्थक्षेत्र वढू बुद्रूक यांच्या वतीने करण्यात आले होते,
अक्षय महाराज भोसले (धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी सांगितले की भडक बोलायचे नाही परंतु जे आपल्या धर्मावर टीका करतात त्यांना धर्माचे रक्षण करता येत नाही अशा भडव्यांबद्दल बोलले पाहिजे, हिंदू धर्माचा विकास खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय यांनी केला, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे तुकोबारायांनी सांगितले, ज्यांना धर्म कळत नाही त्यांनी धर्मवीर या शब्दावर बोलू नये, आमच्या दोन्ही छत्रपतींच्या नावावर तुम्ही राजकारण करता निवडून येता या भडव्यांना आता सांगायची गरज आहे की तुला कोणी मोठा केला,आम्ही शंभूराजांना धर्मवीर का म्हणतो आमच्या आई -वडिलांनी सांगितलय, धर्मवीर कसे पाहायचे असेल ना टीका करणारानी एकदा वढुत ये लोकं आता चपलाने हाणतील ना मग कळेल, ज्यांना धर्मवीर शब्दाविषयीची शंका आहे त्यांनी आईला विचारावे, आई जसे बा बा बा करून बाप शिकवते तसे या भडव्यांना शिकवण्याची गरज आहे, हे तिघेजण जाणीवपूर्वक तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत, मागेही या गावाने खूप मोठे संकट झेलले आहे, 700 वर्षांपूर्वी रेड्याला समजलं कोणाच्या मागे जायची परंतु आत्ता या दोन पायाच्या म्हशीला समजलं नाही असे विधान करत सुषमा अंधारे यांना देखील महाराजांनी चांगलाच झटका दिला, या ठिकाणी बऱ्यापैकी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व इतर पक्षाची मंडळी आहेत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपण हिंदू म्हणून एक झालं पाहिजे,



