लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
हवेली तालुका देखरेख सहकारी संघ च्या अध्यक्ष पदी प्रशांत दत्तात्रय काळभोर यांची तर उपअध्यक्ष पदी जितेंद्र राजाराम कोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ,नुकतीच संघाची निवणूक बिनविरोध झाली होती यामधे संचालक म्हणून मिलापचंद धनाजी गायकवाड, वसंत सोपानराव जगताप , कल्याण अंकुश शिंदे , सुभाष सदाशिव टकले व लक्ष्मण बबनराव माताळे यांची निवड करण्यात आली होती.
यावेळी बोलतांना हवेली तालूक्यातील शेतकरी सभासदांना लवकर व सुलभ कर्जपुरवठा व्हावा तसेच सचिव व विकास सोसायटीत संचालक मंडळ यांचेमध्ये समन्वय साधून कामकाज मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व तालु्क्यातील विकास सोसायटी मजबूत करण्यावर भर देणार असले चे नवनिर्वाचित अध्यक्ष काळभोर यांनी सांगितले
यावेळी, मा. सभापती कृषी उ. बाजार समिती प्रताप अण्णा गायकवाड, पिडीसीसी संचालक विकास नाना दांगट, प्रदीप दादा कंद, मा. सभापती कृषी उ. बाजार समिती दिलीप दादा काळभोर, पिडीसीसी संचालक प्रवीण शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, मा. सभापती कृषी उ. बाजार समिती प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, संचालक साधना बँक संचालक विकास तुपे, राजेंद्र खांदवे, सोनबा चौधरी, नितीन पाटील, साधना बँक संचालक प्रताप बोरकर,सुभाष काळभोर, जि. प. माजी सदस्य लक्ष्मण केसकर, संजय गायकवाड, हवेली खरेदी विक्री संघ अध्यक्ष दत्ताभाऊ पायगुडे उपस्थित होते.

