March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                 पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या, चांगली आर्थिक उलाढाल असणाऱ्या हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी पतसंस्थेचा पेरणे शाखेचा  13 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला, यावेळी पेरणे व परिसरातील गावांमधील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये  नियुक्त झालेल्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला,             

   मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या तसेच चांगल्या नावारूपाला आलेल्या, पेरणे गाव व  आसपासच्या गावांमधील शेती क्षेत्र, उद्योग व्यवसाय, यांना वित्त पुरवठा करून त्यांना वृद्धिंगत करणाऱ्या या संस्थेची सामाजिक बांधिलकी बहुचर्चित आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या पतसंस्थेने  परिसरातील उद्योग व्यवसायांना पाठबळ दिले आहे, आर्थिक उलाढाल चांगली असून संस्था नावा रूपाला आणण्यासाठी हवेली तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सागर नाना चौधरी यांचे खूप कष्ट आहेत,            

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुनमताई सागरनाना चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग ज्ञानोबा खेडेकर,संचालक सागरनाना हनुमंत चौधरी,अविनाश नामदेव जगताप, जयवंत मस्कु चौधरी, दिनकर ज्ञानोबा गव्हाणे, विठ्ठल भगवान चौधरी, अमोल शंकर चौधरी, तानाजी विलास चौधरी, ज्ञानेश्वर गुलाब जवळकर, शिवाजी सोमा केसकर, रेश्मा मोहन चौधरी, तज्ञ संचालक संभाजी हिरामण वाळके, गोरख निवृत्ती चौधरी, सल्लागार संचालक रघुनाथ किसन चौधरी, नितीन पोपट गव्हाणे, केशव विठ्ठल चौधरी, मुख्य व्यवस्थापक अनिल जवळकर, रोखपाल जमादार मॅडम, लिपिक विठ्ठल पवार आदी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते,    

याप्रसंगी पेरणे तसेच आसपासच्या गावांमधील नवनिर्वाचित सरपंचांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला, त्यामध्ये पेरण्याचे सरपंच उषा वाळके, बुर्केगावचे सरपंच रुपाली थोरात, पेरणे ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळके, अंकिता सरडे, कल्पना वाळके, बुर्के  गावचे माजी सरपंच संतोष पवळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील ठोंबरे,मनोज जांभळकर, रामदास ठोंबरे,वर्षा गुंड, त्याचप्रमाणे संगीता भोकरे, कमल वाळके, अशा गव्हाणे, दीक्षा गव्हाणे, राजू गवदे, गव्हाणे, तसेच इतर पदाधिकारी, संस्थेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी सत्यनारायणाची महापूजा तसेच उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला,