March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
      बालपणापासून सायकलचा छंद असलेल्या खेड तालुक्यातील वरुडे वाफगावच्या संपत ज्ञानेश्वर चौधरी या तरुणाच्या विक्रमी सायकल प्रवासाने ऐकणारे अवाक होऊन बोलतात , चौधरी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सायकलवरून केला त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,    

आम्हाला पुण्याहुन ५० किलोमिटर कारने यायला नको वाटते आणि हा कात्रजहुन ७० किलोमिटर उन्हात सायकलवर आलाय ? माजी सैनिक कॅप्टन उतम चौधरीचे पुजेला सायकल वरून आलेल्या या भावकीतिल तिसीच्या तरुणाची शौर्यगाथा ऐकून डॉ. शहाजी शितोळे या सायकलपटटूसह सारे आप्तेष्ट अवाक होऊन ऐकत होते . कन्याकुमारी ते जम्मूकाश्मीर हा ३८०० किलोमिटरचा प्रवास या संपतने १५ दिवसात केला आहे . तो नोकरीस असलेल्या खेड शिवापुरचा १५ किलोमीटरचा घाट चढून तो रोज कंपनीत सायकलवरच कामावर ड्युटीस जातो . पंढरपुर, शिर्डी, तुळजापुर ला लोक गाड्या करून जातात, पण हा सायकलवर देव देव करतो . मावळ अथेलेटस् असोशियन हा ५०० राईडर्सचा त्यांचा ग्रुप असून ते शाळांनी कँप घेऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सायकल वाटपही करत असतात . ते प्रवासासाठी सुरुवातीला साधी सायकल वापरत पण जसा देशभरचा प्रवास आरंभला तेंव्हा त्यांनी दिड लाख रुपयाची ही कॅनडल कंपनीची सायकल घेतली . इतकी महागाची परवडते का विचारता तेवढ्या रकमेचे पेट्रोल तर ६ महिन्याला स्कूटरला लागते तर मग महाग कशी ? पुर्ण फायद्यात आहे . आणि दुसरा खरा फायदा म्हणजे नियमीत सायकल चालवण्यामुळे शारीरीक व्यायामात ब्लड सर्क्युलेशन होऊन माणसाला बीपी शुगर आदी बिमारी कधीच होणार नाही . अन्यथा अलिकडे साधे अर्धा एक किलोमिटरवर बाजारात व शाळेत जायला कुणी गाडीशिवाय जायला मागत नाही व सुखासीन बैठी सवय लागत स्थुलपणा चरबी कोलेस्ट्रालने शरीर व्यापते व हालवत नाही . परीणामे खाण्यावर बंधने येतात . आर्थिक तोट्यापेक्षा हा शारीरीक बदल जास्त हानीकारक असून लहान मुलांनी मोटार गाड्यांची हाव न धरता प्रकृती स्वास्थ्यासाठी सायकलच वापरावी असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला . सायकल वापराने  एकतर प्रदूषणास आळा बसेल व दुसरे आजारपणाचा खर्च वाचुन शरीरस्वास्थ्य लाभेल, निरोगी तंदुरुस्त जिवन जगायचे असेल तर तरुणाईने सायकल वापरावी असा सल्लाही संपत चौधरी या सायकल पट्टूने दिला .