सुनील भंडारे पाटील
येत्या 13 तारखेला शिरूर हवेली लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार लढत होणार असून या निवडणुकीसाठी अनेकांनी आपला अर्ज दाखल केला आहे, विद्यमान खासदार कोल्हे यांच्या मतदारसंघांमधील विकास कामांची रेलचेल पाहता, समाजामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होण्यासाठीची चर्चा मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,
कोल्हे यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्व मधून जनतेशी वेळोवेळी संपर्क साधला आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे त्यामुळे त्यांनी समाजामध्ये एक मानाचे स्थान मिळवले आहे, शेतकरी वर्गामध्ये कणा समजला जाणारा बैलगाडी शर्यतीचा मुद्दा त्यांनी मार्गी लावला, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न इतर महत्त्वाचे सामाजिक प्रश्न संसदे मध्ये मांडण्यास त्यांनी कायम प्रयत्न केले,
विशेष म्हणजे मतदार संघामधील स्वराज्याची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या वडू बुद्रुक तालुका शिरूर, तुळापूर तालुका हवेली येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळवून देऊन संकल्पनेला एक चांगली दिशा दिली त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनामध्ये घर केले आहे,
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या जडणघडणी झाल्या परंतु अशा काही गोष्टींना बळी न पडता त्यांनी आपले विचार स्थिर ठेवले, 84 वर्षाच्या योद्धा बरोबर खंबीरतेने साथ देऊन शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या साथीने राजकारणाची एक दिशा ठरवली, याचा प्रभाव जनतेमध्ये तयार झाला असून या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदार होण्यासाठीची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे,
