March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            बारामती लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान दि.७ मे रोजी पार पडलेलआहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामतीमध्येही मतदान झालं. आज झालेल्या या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ५६.७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने दिला आहे.

बारामतीच्या ६ विधानसभा मतदार संघापैकी बारामतीमध्ये ६४.५० टक्के, भोरमध्ये ५८.५२ टक्के, दौंडमध्ये ५७.८० टक्के, इंदापूर मध्ये ६२.५० टकके, खडकवासल्यामध्ये ५० टक्के आणि पुरंदरमध्ये ४८ टक्के मतदान झालं आहे. बारामतीच्या या लढाईमध्ये खडकवासला मतदारसंघाचा आकडा आता निर्णायक ठरेल, असं अनेक तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे खडकवासला मतदार संघाचे आकडे नेमकं कुणाचं टेन्शन वाढणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला, बारामतीच्या या लढतीमध्ये महाराष्ट्राने पहिल्यांदाच पवार कुटुंबातला संघर्ष बघितला. बारामतीची जागा जिंकण्यासाठी अजित पवार आणि शरद पवारांनी जंग जंग पछाडलेले आहे. 

आता या लढतीत नेमका कोण विजयाची बाजी मारणार हे ४ जूनच्या निकालानंतरच चित्र आता स्पष्ट आहे.महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ६१.४० टक्के मतदान झालेलं आहे. या टप्प्यात ११ लोकसभेच्या जागांसाठी मतदान झाले यामध्ये लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, बारामती, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, माढा आणि सोलापूर या लोकसभा जागांसाठी मतदान पार पडलेल आहे.
महाराष्ट्रात कोठे किती मतदान झाले त्याची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे
लातूर – ६०.१८ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
बारामती – ५६.७० टक्के
हातकणंगले -६७.६१ टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
उस्मानाबाद – ६०.९१ टक्के
रायगड – ५८.१० टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
सातारा – ६३.५० टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
वरील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पारपडून तेथील असणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आसून याचा निकाल ४ जुन नंतरच स्पष्ट होणार आसून यामध्ये कोण उमेदवार बाजी मारणार हे समजनार आहे.