March 30, 2026

विशेष प्रतिनिधी

           गोरगरीबांच्या घराचे स्वप्न साकार व्हावे या गोडस नावाखाली चक्क महाराष्ट्र सरकारने नविन वाळू धोरण ठरवले ! दस्तुरखुद महसुलमंञी विखे साहेबांनी गरीबाचे कोटकल्याण करण्यासाठी मोठ्या हिरीहिरीने ही योजना मंञीमंडळाच्या गळी उतरवली..राज्यातील पहिला पथदर्शी प्रयोग म्हणून शिरुर तालुक्यातील निमोणे नजिक पिंपळाची वाडी व चिंचणी येथील घोडनदी पाञातून वाळू उपसा करण्याचे तथाकथित ठेकेदारांना आदेश दिले..

               .गाय गुय्रांच्या चाय्रासाठी राखीव असलेल्या गायरानावर ठेकेदाराने शमयाना उभारुन वाळूची रास लावली…घोडनदीपाञात यांञिक बोटींची जणू याञा भरली ..वाळू डेपोवर आडदांड गावगुंडाच्या चौक्या- पहारे बसवून दररोज शेकडो हायवा- ट्रक मधून राजरोस वाळूची वाहतूक सुरु ही झाली…online पाहिले तर वाळू डेपो मध्ये  वाळू अर्धा ब्रास सुध्दा दिसत नाही मग शेकडो ट्रक वाळू जाते कुठे ? मागील चार महिन्या पासून पिंपळाचीवाडी येथील नदीपाञाची चाळण करुन दररोज शेकडो ट्रक वाळूचा उपसा होत आहे..यातील किती वाळू गोरगरीबांच्या घरासाठी मिळाली…निमोणे परिसरातील एकाही माणसाला एकही ब्रास वाळू या ठेकेदाराने टाकली नाही…online प्रक्रिया करायला गेले की यंञणा ठप्प ..मग हा वाळू डेपो नक्की कशासाठी सुरु केला आहे..

         

सततच्या वाळू वाहतूकी मुळे या परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे ..शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे..सततच्या बेफाम वाळू वाहतुकीमुळे शालिय विद्यार्थांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे…बरं हा सगळा खटाटोप नक्की कोणासाठी  बेसुमार वाळू उपसा करुन नक्की प्रशासन डोळ्यावर पटी बांधून का शांत आहे हेच कळायला मार्ग नाही…दरम्यान पिंपळाच्या वाडीच्या ग्रामस्थांनी नुकतीच बैठक घेऊन हा अनागोंदी कारभार थांबला नाही तर प्रसंगी शिरुर तहसिलदारां समोर अमरण उपोषण करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे,