लोणी काळभोर प्रतिनिधी
शरद पवार यांचा सोलापूर दौरा होणार आहे. या दौऱ्यापूर्वी चौघांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे चौघे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहे.सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
q शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला धक्का देण्यात आला आहे. सोलापूर शहरातील 4 माजी नगरसेवकांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या चौघांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक इरफान शेख यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अजित पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत सोलापूर शहरातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. सोलापूरच्या विकासावर चर्चा झाली. यावेळी आनंद चंदनशिवे, तौफिक शेख यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आता सोलापुरात होणाऱ्या मेळाव्यात या चौघांचा प्रवेश होणार असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले.
