March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

       धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक  गावातील इयत्ता दहावीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. सन 2000 -2001 च्या दहावीच्या बॅचच्या वतीने हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.   

 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजा करून यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेबद्दल असलेल्या प्रेमापोटी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती व शाळेच्या बाबत कृतज्ञता म्हणून वृक्ष लागवड करून सामाजिक संदेश दिला आहे. यावेळी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाचे तत्कालीन वर्गशिक्षक असलेले सोमनाथ बबनराव भंडारे सर यांचा व प्राथमिक शाळेचे वर्गशिक्षक असलेले श्रीहरी नामदेव पावशे व वर्गशिक्षिका राधिका श्रीहरी पावशे या शिक्षक दांपत्याचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तब्बल 22 वर्षानंतर जवळ जवळ 51 विद्यार्थ्यां- विध्यार्थीनी यांनी यावेळी हजेरी लावली.

शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय विद्यालयास या बॅचच्या वतीने पहिल्या मजल्यावर  स्टेनलेस स्टीलचे ग्रील चे काम करून दिले. जेणेकरून विद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ग्रील चे काम करून देण्यात आले. झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वढू बुद्रुक गावचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे पाटील यांनी केले. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या बॅचमधील विद्यार्थी असलेले पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत संदेश शिवले व वढु बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला .तसेच वर्गशिक्षक असलेले केंद्रप्रमुख पावशे गुरुजी, केंद्रप्रमुख पावशे मॅडम व सोमनाथ भंडारे सर यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. गतकाळात घडलेल्या अनेक गोष्टींना यावेळी उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाचे आभार नामदेव शिवले यांनी मानले.हॉटेल चिंचवन येथे सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.