परेश सुराणा यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बाजरीच्या कट्टयामध्ये दीड तोळ्याचे मंगळसूत्र सापडले होते. त्यांनी ते त्यांचे मालक परेश सुराणा यांना परत केले आणि दाखवून दिले की जगामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे त्यांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शाळेमध्ये परेड साठी महेश चासकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या नंतर विद्यार्थीनी देशभक्तीपर गीत , देशभक्तीपर गीतावर नृत्य , प्रार्थना आणि नाटक या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांनी नाट्यछटा आणि समूह गीत अशा विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली .
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले आणि या प्रामाणिकपणाचा भविष्यात आपल्याला कुठेही उपयोग होऊ शकतो हे सांगितले आणि शाळेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या सर्व कार्यक्रमाचे पूर्ण व्यवस्थापन एकता मिस यांनी केले होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
