या बाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.व्यावसायिक कोंढव्यातील क्रांती चौक परिसरात राहायला आहे. १३ जुलै रोजी व्यावसायिकाच्या घरातून आरोपींनी सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गोकुळनगर भागात रिझवान आमि इकरार संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. रखवालदार नसलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन ते पाहणी करत होते. पाहणी करत असल्याचे समजले.पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.
चौकशीत दोघांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरलेला ऐवज दिल्लीतील घरात लपवून ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. रिझवान सराइत गुन्हेगार आहे.
