March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
        वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास 16 ते 17 महिने झाले आहेत परंतु महानगरपालिकेकडून वाघोलीच्या  विकासाबाबत कुठली ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही.वाघोली मधील शासकीय जमीन, गायरान क्षेत्र, रस्ते, शाळा, दवाखाना हे देखील आज तागायत महानगरपालिकेने हस्तांतरित करून घेतले नाही, त्यामुळे वाघोलीच्या विकासाला अडचणी येत आहेत.  

त्यातच वाघोली मध्ये गायरान क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या गायरान क्षेत्रावर शासनाच्या वतीने विविध प्रकारची आरक्षणे टाकून ती जागा न्यायालय,औद्योगिक शिक्षण संस्था सह इतर प्रकल्पांना देण्याबाबत विचार सुरू आहेत. 

नुकतीच वाघोलीतील बाजार तळाची पाच एकर जागा न्यायालयासाठी मोजून देण्यासाठी न्यायालयाचे अधिकारी, भुमिअभिलेखचे अधिकारी, यासह मंडलअधिकारी, तलाठी आले असता वाघोली ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत आहे
      वाघोलीतील बाजार तळाची जागा वाघोलीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे तसेच गेले अनेक वर्षापासून येथे बाजार भरत आहे, हीच  बाजाराची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायालयासाठी देण्यास हालचाली सुरू झाल्या आहेत याला आता वाघोलीकरांनी विरोध देखील दर्शविला आहे,
         परंतु महानगरपालिकेने वाघोलीचा महानगरपालिकेत सामाजिक झाल्यानंतर वाघोलीतील शासकीय जागा, गायरान क्षेत्र, शाळा, रस्ते, दवाखाना त्वरित हस्तांतरित करून घेतले असते तर आता इतर प्रकल्पासाठी वाघोलीतील जागा दिल्या गेल्या नसत्या. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने तात्काळ वाघोली येथील गायरान क्षेत्र, शासकीय क्षेत्र, रस्ते, दवाखाने, शाळा महानगरपालिकेत हस्तांतरित करून घेऊन वाघोलीच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे