March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
              शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेतून मुखई शाळेतील 4 खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली असल्याची  माहिती विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली.      

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा *साधू वासवानी इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी* या ठिकाणी घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत विद्यालयातील 6 खेळाडू हे वयोगट 17 व 19 वर्षा खालील गटात सहभागी झाले होते. त्यातील नेहा अजय शेगर ( 19 वयोगट ) तसेच स्मृती विष्णू सांगळे, आर्या महेश शिरसाट, राजवर्धन तुकाराम शिरसाट( 17 वयोगट ) या खेळाडूंनी उत्तम खेळ करीत  जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केल्याने आश्रम शाळेतील या चारही खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली आहे. स्क्वॅश हा खेळ तसा जास्त प्रमाणात शहरी भागात खेळला जाणारा खेळ आहे परंतु मुखई आश्रम शाळेत तो क्रीडा शिक्षक मनोज धिवार यांनी नव्याने सुरु करून अथक प्रयन्नांनी खेळाडूंची तयार केल्याने शाळेला या क्रीडा प्रकारात प्रथम वर्षीच मोठे यश प्राप्त झाले आहे .  संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अँड अशोकराव पलांडे, सचिव सुरेश पलांडे, संस्थेचे सीईओ मंगेश मोरे, प्राचार्य तुकाराम शिरसाट  यांनी यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक मनोज नामदेव धिवार व वैभव साबळे यांचे अभिनंदन केले.