रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
वाघळे (तालुका शिरूर) येथील शिवारामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून ही पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर रात्रीच्या सुमारास शेता मध्ये बिबट्या शेतकर्यांना दर्शन देत असल्याने रात्रीची शेतातील कामे करणे मुश्कील होऊन बसले आहे. एकीकडे बिबट्याचा शिवारातील वाढलेला वावर तर दुसरीकडे वेळोवेळी होत असलेले भारनियमन व ट्रान्स्फॉर्मरमधील तारांच्या चोरांनी वाघाळे परिसरातील शेतकरी हैराण झाला असून पोलीस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त करावा व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे यांनी केली आहे.कारण शनिवारी राञी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावडे वस्ती जवळील शेतांमध्ये बिबट्या दिसुन आला. त्याच राञी चासकमान चारी वरील ट्रान्सफाँर्मर मधील तारा चोरी झाल्याची घटली आहे. त्यामुळे या दोन्हीही गोष्टींचा बंदोबस्त प्रशासनाने करावा अशी मागणी गावडे यांनी केली आहे.

