March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यस्तरीय अधिवेशन सातारा जिल्ह्यातील वाई येथे नुकतेच संपन्न झाले.   

अधिवेशनाचे उद्घाटन सिक्कीम चे माजी राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे, उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणभाई शहा होते.

 या अधिवेशनास राष्ट्रीय उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, सचिव संदीप जंगम, जिल्हा अध्यक्ष शुभदा नागपूरकर, जिल्हा संघटक प्रवीण शहाणे , केदार नाईक, उर्मिला येळगावकर, जयदीप ठुसे आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.