March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

 
    शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरामध्ये बहु चर्चेत असलेला
खाते वाटपाचा मुद्द्यावर अखेर शिक्कामोर्तब , राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त
मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडेसामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व
तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प),
परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती
व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग
आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व
लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*
*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
*सुधीर मुनगंटीवार-*  वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
*चंद्रकांत पाटील-* उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
*डॉ. विजयकुमार गावित-* आदिवासी विकास
*गिरीष महाजन-* ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
*गुलाबराव पाटील-*पाणीपुरवठा व स्वच्छता  
*दादा भुसे-* बंदरे व खनिकर्म 
*संजय राठोड-* अन्न व औषध प्रशासन
*सुरेश खाडे-* कामगार
*संदीपान भुमरे-* रोजगार हमी योजना व फलोत्पादन
*उदय सामंत-* उद्योग
*प्रा.तानाजी सावंत-* सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
*रवींद्र  चव्हाण -* सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण 
*अब्दुल सत्तार-* कृषी
*दीपक केसरकर-* शालेय शिक्षण व  मराठी भाषा
*अतुल सावे-* सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
*शंभूराज देसाई-* राज्य उत्पादन शुल्क
*मंगलप्रभात लोढा-* पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास