March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
        पिंपळे खालसा(ता.शिरूर) येथील पैलवान शैला बंडोबा धुमाळ  यांनी लहानपणापासून मेहनतीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक पदक मिळवून पिंपळे खालसाच्या शिरपेचात मानाचा तुरा नेहमीच रोवला आहे ,  

 गरीब कुटुंबातील ही मुलगी आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावरती ‘महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ‘ २वेळा ब्राॅंझ पदक(२०१७/२०२०) “पुणे महापौर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ब्राॅंझ पदक “ऑल इंडिया युनिव्हर्सिटी “सिल्वर पदक ,”हिंदू गर्जना केसरी” ५३ किलो गट प्रथम क्रमांक, मुखत्यार केसरी २०१९ प्रथम क्रमांक,”राज्यस्तरीय वडजाई कुस्ती स्पर्धा” प्रथम क्रमांक “विभागीय कुस्ती स्पर्धा” २०१४ ,५० किलो प्रथम क्रमांक,” राजमाता मासाहेब जिजाऊ महिला कुस्ती स्पर्धा पुणे” २०१३ प्रथम क्रमांक ,”महाबली कुस्ती स्पर्धा” प्रथम क्रमांक, “वस्ताद नारायण सावळेराम घुमे यांच्या स्मरणार्थ महिला कुस्ती स्पर्धा२०१९ प्रथम क्रमांक,” महात्मा फुले युवा मंच हडपसर गाव राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा” तृतीय क्रमांक ,आणि “शिरूर केसरी मल्ल सम्राट २०२० “हा मानाचा किताब त्यांनी अगदी कमी वयामध्ये पटकावला अशा महत्त्वाच्या आणि महत्वपूर्ण कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होवून त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि नुकतेच त्यांचे “नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स पटियाला पंजाब “(N.I.S)येथील दीड महिना ट्रेनिंग मध्ये महाराष्ट्रातून  “A” ग्रेड मध्ये प्रथम क्रमांक “N.I.S.कोचपदी” निवड झाल्याबद्दल  त्यांचे “राष्ट्रीय मानवअधिकार आणि भ्रष्टाचार निवारण (भारत) पुणे जिल्हा कार्यकारिणी” च्या वतीने सर्टिफिकेट आणि शाल /श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ह.भ.प.वसंतराव वामनराव धुमाळ महाराज, मा.सरपंच राजेंद्र धुमाळ पिंपळे खालसा, निलेश बंडोबा धुमाळ सर, आणि” राष्ट्रीय मानवअधिकार आणि भ्रष्टाचार निवारण (भारत) पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ उपस्थित होते ह.भ.प.वसंतराव धुमाळ महाराज यांनी पै.शैला धुमाळ यांचे विशेष कौतुक करुन आशिर्वाद दिले तसेच पुढील काळामध्ये अशीच प्रगती त्यांनी करावी अशा शुभेच्छा उपस्थित सर्वांनी दिल्या.