March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी स्टँडवर स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी, तसेच प्रातःविधीसाठी प्रवाशांकडून राजरोसपणे पैसे उकळले जाण्याचा प्रकार सर्रास घडत आहे, संबंधित खात्याचे कर्मचारी, अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत,            

  राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांपासून ग्रामीण भागाला जोडले जाणारे महत्त्वाचा दुवा म्हणजे एसटी, एसटीने प्रवास करताना लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करत असताना प्रवासी सोडण्यासाठी, नवीन प्रवासी उचलण्यासाठी, नाश्ता,जेवण, लघु शंका, प्रात विधीसाठी, गाड्या एसटी स्टँडवर थांबवले जातात, संबंधित एसटी स्टँड जुन्या काळापासून अस्तित्वात आहेत, परंतु एसटी स्टँडवर प्रवाशांची सतत हेळसांड होताना दिसते, लांब प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना तातडीची लघुशंका, प्रातःविधी साठी घाई असते, अशा वेळेस एसटी स्टँड मधील स्वच्छतागृहात प्रवेशद्वारावर टेबल खुर्ची लावून बसलेला व्यक्ती पाच रुपये दहा रुपयांसाठी आडून राजरोसपणे पैसे उकळले जातात, बरं यावेळी पैसे कोण बरोबर ठेवतो? किंवा सुट्टे पैसे असतात नसतात,?, समोरील व्यक्तीला तातडीने जाणे आहे, याचा देखील विचार केला जात नाही, तातडीने स्वच्छतागृहात सोडले नाही तर त्या व्यक्तीने तिथेच कार्यक्रम उरकायचा का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, बरं या ठिकाणी आणखीन एक लाजिरवाणी बाब लक्षात आली आहे, की प्रवासी महिलांना देखील पैसे दिले नाही तर स्वच्छता ग्रहात प्रवेश करून दिला जात नाही, त्यामुळे अनेकदा संबंधित ठिकाणी वादावाद होत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे संबंधित खात्याने यावर निर्णय घेऊन लोकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे,