March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                हवेली तालुक्याच्या पूर्वपट्यातून कृषी क्षेत्रात महत्त्वाचा समजला जाणारा यशवंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असताना शेतकरी सभासदांनी घेतला मोठा निर्णय, नवीन कार्यकारणीसाठी  आता होणार यशवंतची निवडणूक,            

        थेऊर या ठिकाणी स्थित असलेल्या या कारखान्याची स्थापना अनेक वर्षांपूर्वी झाली, अतिशय चांगल्या अवस्थेत चालू असलेला साखर कारखान्याला राजकारण्यांची कीड लागल्याने हा कारखाना धुळ खात पडला आहे, हवेली मधील अनेक शेतकऱ्यांच्या घामाने उभा राहिलेला यशवंत सहकारी साखर कारखाना राजकारण्यांनी मोडकळीस आणला, त्यामुळे कारखान्यावर अवलंबून असणारे शेतकरी, कामगार, सभासद यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आज कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेमध्ये कारखान्याच्या सभासदांची यादी अद्ययावत करून  निवडणूक घेण्यात यावी या निर्णयाला मंजुरी मिळाली कारखाना लवकर चालू होण्याच्या दिशेने अखेर रयत शेतकरी संघटनेला यश आले,     

           यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या या निर्णयाबद्दल हवेली तालुक्यातून कौतुक होत असून राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळे संपलेला कारखान्याचे आता फक्त सभासद आणि सभासदच चांगले करू शकतात, त्यामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळ निवडताना चांगले तरुण आणि होतकरू अशा लोकांना निवडून द्या असे आवाहन रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे,