March 30, 2026

हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

         पुणे – मेरी सहेली मंडळा तर्फे यंदा ही दिव्यांग मुले आणि गृहिणी यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून  मंडळाच्या अध्यक्षा देवी तन्ना गेली अठरा वर्षे हा उपक्रम राबवितात.               

यंदा  मंडळाचे २१वे वर्ष असून गेली दोन वर्षे कोरोना मूळे कोणतेच उपक्रम राबवता न आल्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे  देवी तन्ना  यांनी सांगितले.  

बिबवेवाडी  येथील लाईटहाऊस मॉल येथे दि. २० आणि २१ जुलै दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या  वेळेत आयोजित करण्यात येणार असून यामध्ये दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या राख्या, विविध आकर्षक वस्तु तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी बनवलेल्या वस्तु व पदार्थ याचा समावेश  करण्यात आला आहे.      

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मेरी सहेली महिला मंडळा तर्फे  विविध उपक्रम राबविले जातात. प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून महिला उद्योजिकांना मार्गदर्शन सत्र तसेच डेकोपेज आर्ट वरील प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहॆ. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.स्टॉल बुकिंग व इतर माहितीसाठी या 9372284222 क्रमांकावर  संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,