March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी 
        लोणी काळभोर : (तालुका हवेली) मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई येथील मंत्रालय अशी निघालेल्या मराठा वनवास यात्रेचे लोणी काळभोर येथे सर्व पक्ष व सकल मराठा समाजाने स्वागत केले. यावेळी पायी चालत आलेल्या सर्व मराठा बांधवांना ग्रामदैवत अंबरनाथ येथे.रात्रीचा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.     

  वनवास यात्रेचे नेतृत्व करणारे प्रमुख योगेश केदार यांनी उपस्थित मराठा समाजातील तरुणांना मराठा आरक्षण काळाची गरज आहे. यासंदर्भात प्रबोधन केले.आरक्षण म्हणजे नेमके काय? संविधानातील आरक्षणाच्या नेमक्या तरतुदी काय आहेत? आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची कशाप्रकारे फसवणूक केलेली आहे? ५० टक्क्यांच्या आत ओबीसीमधूनच आरक्षण कसे मिळेल? तसेच पारदर्शक पद्धतीने जातीनिहाय जनगणना करून महाराष्ट्रातील जातींची योग्य आकडेवारी समोर आणली जावी,   

        अशा विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वनवासी यात्रा काढलेली आहे. लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर आम्ही धड़क देणार आहोत.पुणे लाल महाल येथे महा मेळावा घेऊन मराठा समाजाचे प्रबोधन करणार आहे असे हि यावेळी बोलले.
        आमचा लढा संविधानाला अनुसरून असल्याने कायद्याचे पालन करण्यावर आमचा विशेष भर आहे. परंतु, जर सरकारकडून कोणत्याही प्रकारची आगळीक झाली अन् परिस्थिती हाताबाहेर गेली तर याला सर्वस्वी जबाबदार सरकारच असेल. मराठा समाजातील सर्व पक्षीय नेते,पत्रकार,ग्रामस्थ, भजनी मंडळ यांचा कडून मराठा वनवास यात्रा प्रमुख:- योगेश केदार, प्रतापसिंह पाटील, सुनील नागणे यांचा सत्कार करण्यात आला.
       एक मराठा मराठा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाज लोणी काळभोर व कदम वाकवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते.वनवासी यात्रेमध्ये लोणी काळभोर जाहीर पाठिंबा आहे.असे सरपंच गावचा वतीने बोलले.व सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप केला.