सुनील भंडारे पाटील
निव्वळ मराठा समाजाला मुर्ख बनवनं चालू आहे, आज सचिवांनी जी माहिती जरांगे पाटलांना दिली तीच चुकीची आहे, कारण नव्या नोंदी केवळ ३२ हजार सापडलेल्या असतांना(कारण ५४लाख नोंदीतील९९% लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे),सरकार म्हणत आहे की,५७ लाख नोदी सापडल्या, सरकारने अजून एक चुकीची माहिती दिली ती म्हणजे ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले,
मुळात ज्या लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र होते अशाच लोकांना सरकार आता “आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले” असं म्हणतंय,हे असं म्हणनं म्हणजे मराठा समाजाची “घोर शुध्द फसवून” आहे,उद्या जेव्हा सरकार तर्फे “कुणबी प्रमाणपत्र देलेल्या मराठ्यांचा डेटा” सादर करण्यात येईल, तेव्हा ह्याच “ऑलरेडी कुणबी” असणाऱ्यांचाच डेटा सादर केला जाणार व असे सांगितले जाणार की,” आम्ही ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले ” पण ही मराठा समाजाची साफ फसवणूक आहे कारण, ह्या ५७ लाख लोकांपैकी ९९% मराठे मुळातच कुणबी आहेत व ते कुणबी असल्याचा लाभ घेत आलेले आहेत,
जेव्हा सरकारणे “मुळातच कुणबी असणारांना” ह्या यादीत घेतले तेव्हाच सरकारने “खरा डाव” खेळला आहे,कारण मुळातच कुणबी असणारांना पुन्हा एकदा ” कुणबी प्रमाणपत्र ” वाटून खऱ्यां गरजवंत मराठ्यांना, ओबीसी आरक्षणा पासून लांब ठेवले व ओबीसी नेत्यांचे हे सांगून समाधान केले की,आम्ही तुमच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावला नाही, कारण आम्ही त्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे, जे ऑलरेडी कुणबी च होते,अशा प्रकारे सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात चालवला आहे, भोळे भाबडे मराठे वेडे बनतीलही पण संपूर्ण मराठा समाज भोळा भाबडा नाही ही गोष्ट सरकारने लक्षात ठेवावी,सकल मराठा समाज, न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवील,
