March 30, 2026
गावडेवाडी, प्रतिनिधी मिलिंद टेमकर
          मंचर (ता आंबेगाव) मंचर शहरात  मंचर येथील .वैभव बाणखेले यांनी रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनचे फोनवर फोन करून कळविले की मुळेवाडी रोड येथे पाच चोरटे किराणा दुकानाचे शटर उचकटत असताना    

त्यांना हटकले असता ते स्कूटी मोटार सायकल वरून एस टी स्टॅडचे बाजूला पळून गेले आहेत असे कळविले असता पोलीस ठाणे अंमलदार  डावखर सर व पोलीस अंमलदार माताडे हे तात्काळ सदर चोरट्यांचा लक्ष्मी रोड येथे जावुन शोध घेतला असता चोरटे स्टार बार दुकान फोडत होते त्यांनी पोलिसांना पाहिल्याने  पाच चोरटे स्कुटी मोटर सायकल वरून  पळून जात होते त्यावेळी पोलीस अंमलदार माताडे यांनी  साधारण अंदाजे 300 मीटर पायी धावत पाठलाग करून  विकास थिएटर समोरील रोडवर एका चोरट्याला रंगेहाथ पकडले सदर धावपळीत दिनेश माताडे यांचे हाताला व पायाला खरचटले आहे परंतु त्यांनी व पोलीस हवालदार डावखर सर यांचे मदतीने एका चोरट्याला रंगेहाथ पकडले आहे, मंचर पोलीस चे या कामगिरी बद्दल परिसरात कौतुक होत आहे,