पुणे अहिल्यानगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने भगव्या वादळाचा महापूर लोटला असून पोलीस खात्याच्या वतीने वाहतुकीचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे, आंदोलकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तसेच कुठल्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये, यासाठी महामार्गावरील वाहतूक वेगवेगळ्या पद्धतीने वळवण्यात आली आहे, शिरूर शहर, कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, वाघोली व इतर गावांमधील ग्रामस्थांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून पुणे मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या भगव्या आंदोलकांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत, कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही,
ग्रामस्थांच्या वतीने पाणी बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे, चहा, तसेच गाव गावच्या प्रत्येक घरामधून 10 भाकरी, भाजीचे पॅकेट उपलब्ध करून दिले असून पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, शिवाय महामार्गवर वाहतुकीमध्ये योग्य बदल करून पोलीस खात्याच्या वतीने वाहतुकीचे योग्य नियोजन केले आहे, सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले,
