March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
               प्लॉटिंग व्यवसाय मधील उत्खननाबाबत बातमी देण्यासाठी माहिती मागितल्याचा राग मनात धरून प्लॉटिंग व्यवसायिकांनी एका पत्रकाराला प्लॉटिंग व्यवसा ऑफिसमध्ये बोलावून मारहाण केली तसेच धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असून या संदर्भात चाकण पोलीस स्टेशन ने तीन जणांना ताब्यात घेतले आहे,

                  चाकण पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार शेल पिंपळगाव तालुका खेड येथे माती व मुरूम उपसा करून रोडने होणाऱ्या मुरूम वाहतुकीचा रहिवासी व येणारे जाणारे प्रवासी यांना होणारा त्रास लक्षात घेऊन बातमी करिता पत्रकाराने रीतसर माहिती मागवली होती, तसेच प्लॉटिंग मधील उत्खननाविषयी च्या सर्व परवानग्या मागितले असता संबंधित पत्रकाराला प्लॉटिंग व्यवसायिकांनी प्लॉटिंगच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले, बोलणी चालू असताना अचानक तीन जणांनी पत्रकारावर हल्ला केला, विश्वजीत दीक्षित, आकाश शिवले या दोघांनी मारहाण केली असून मारुती शिवले याने गचोंडी धरून धमकी व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली, 

                  गुन्हेगारांवर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल पत्रकारांवर होणारे हल्ले ही लाजिरवाणी बाब असून आमच्याकडून कसून तपास केला जाईल, सहाय्यक पोलीस आयुक्त गौर चाकण विभाग, पोलीस उपनिरीक्षक तलवाडे, पोलीस उपनिरीक्षक कातकडे यांनी भेट दिली असून, पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले,

               पत्रकारांवर होणारे हल्ले, दमदाटी ही कालच्या दिवसामधील पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर नंतर हि दुसरी घटना असून समाजाचा तिसरा डोळा तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना समाजातून मात्र अजिबात सहकार्य मिळत नाही, समाजातील अवैध व्यवसायांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारावर जर असे हल्ले होत असतील तर हा खूप मोठा लोकशाहीचा अपमान आहे, अशा घटनेतील आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच पत्रकार संरक्षण कायदा भक्कम करण्याची गरज आहे असे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील यांनी सांगितले,