धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर), श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज विकास आराखडा साठी 384.48 कोटी एवढ्या रकमेचा निश्चित झाला असून 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अंतिम सादरीकरण करणार असल्याचे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी सांगितले,
धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळाचा विकास आराखडा तत्कालीन सरकारने यापूर्वी केला होता, त्यावेळी आराखड्यासाठी 269 कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती, परंतु पूर्वीच्या आराखड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल व सुधारणा करून अंतिम निर्णय घेण्यात आला, त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शंभू भक्तांच्या सूचना देखील मागवण्यात आल्या होत्या, सुधारणा करण्यात आलेल्या विकास आराखड्यासाठी सुमारे पूर्वीच्या रकमेमध्ये 115 कोटींची वाढ करण्यात आली आहे, आपटि – तुळापूर दरम्यानच्या पुलासाठी 27 कोटी प्रस्थापित केले असून, आपटि – वढु बुद्रुक रस्त्यासाठी 60 कोटी प्रस्थापित केले आहेत, त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होणार नाही, यावेळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अनिल ढेपे, प्रकल्प सल्लागार एस व्ही पाटील, जिल्हा नियोजन समितीचे भगवान पोखरकर, देविदास दरेकर, पुणे अभियंता कंत्रालदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील आदि उपस्थित होते, नवीन विकास आराखड्याचे वढू बुद्रुक – तुळापूर ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे,
” आराखड्यातील प्रमुख बदल “
1)नाव – स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
2) लष्करी भरती व शिवकालीन युद्ध तंत्र प्रशिक्षण केंद्र ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय,
3) छत्रपती श्री शहाजी महाराज ते महादजी शिंदे या मराठा वीर पुरुषांची तेजस्वी स्मृती मालिका दालन,
4) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज संबंधित सर्व ऐतिहासिक कागदपत्रे, जीवन चरित्र ग्रंथ व संशोधन केंद्र,
5) स्वधर्म निधनम श्रेया परोधर्म भयावह हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संबंधित वचन कमान महामार्गावर उभे करणे,
6) भव्य हिंदवी स्वराज्य ध्वज (भगवा ध्वज) उभारणी,