आळंदी प्रतिनिधी
वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ह. भ.प. मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते हरिनाम गजरात कलश पूजन करीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.
यावेळी ह. भ.प. मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन, विना पूजन, कलश पूजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात हरिनाम गजरात अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी ह. भ.प. मारुती महाराज कुरेकर यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पै.किसनराव लांडगे, संचालक प्रवीण काळजे, पंडित तात्या तापकीर, हिरामण बुर्डे, ह.भ.प. महारुद्र रेड्डे महाराज,ह.भ.प. दिनकर माळवे महाराज यांचा सत्कार ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मनोहर भोसले, राजेंद्र नाणेकर, रमेश महाराज घोंगडे, साहेबराव काशीद, एकनाथ देवकर, शिवाजी तळेकर आदी उपस्थित होते.
या वेळी थोरल्या पादुका मंदिरात भाविकांना शुद्ध पिण्याचे पाण्याचे सोईसाठी मुख्याध्यापीका सुनिता भैरवकर यांनी १ हजार लिटर शुद्ध पाण्याचे क्षमतेचे आरो फिल्टर टॅंक यंत्रणा माऊली चरणी अर्पण केली. यावेळी भैरवकर यांचा सत्कार ट्रस्ट तर्फे करण्यात आला.
