सुनील भंडारे पाटील
पुणे,तांत्रिकदृष्ट्या
फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयामध्ये एडवोकेट निसार पठाण यांनी बाजू
मांडत आरोपीला मुंबई उच्च न्यायालयातर्फे अटक पूर्व जामीन मंजूर करून
देण्यास यश आले आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयामध्ये एडवोकेट निसार पठाण यांनी बाजू
मांडत आरोपीला मुंबई उच्च न्यायालयातर्फे अटक पूर्व जामीन मंजूर करून
देण्यास यश आले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाल्याचे नमूद
करण्यात आले होते यामध्ये ऍन्ड.निसार पठाण यांनी योगेश बाबासाहेब
नवखंडे आणि रिया शिवकुमार शर्मा या आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करत मुंबई
उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मंजूर करून दिला आहे.
यापूर्वी जिल्हा व
सत्र न्यायाधीश पुणे यांनी आरोपीचा जामीन फेटाळला होता. मात्र
तांत्रिकदृष्ट्या योग्य बाजू मांडत ऍंड. निसार पठाण यांनी न्यायालयात योग्य
असा युक्तिवाद करत मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करून दिला आहे.