March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी 
     टाकळी हाजी ( ता. शिरूर) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  निमित्त केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार देशात घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या उपक्रमासह विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले,त्यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदार संघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन उपसरपंच अजित गावडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रियंका गुगे,आरोग्य सहाय्यक डॉ.भरत सोदक,पत्रकार संजय बारहाते यांच्या हस्ते झाले.   

रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तसेच स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान मार्फत संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या सहकार्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

                 या शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखाचे सुरक्षा कवच विमा देण्यात आला आहे.काठापूर,पिंपरखेड,मलठण,कवठे येमाई,निमगाव दूडे, जांबूत,वडनेर, शरदवाडी, चांडोह,फाकटे, म्हसे बु.,टाकळी हाजी व परिसरातून अनेक रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी या शिबिराला भेट दिली.प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिरामध्ये काठापूरचे लोकनियुक्त सरपंच बिपिन थिटे,उपसरपंच पैलवान तुकाराम ऊचाळे,माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडीभाऊ जाधव,धोंडीभाऊ गावडे,डॉ.संपत सोदक, स्वप्निल गावडे,अनिल पखाले,संदीप गावडे,श्रीकांत काणे,संदीप चोरे,राहुल चोरे,रणजित गावडे,पत्रकार विजय थोरात,ज्ञानेश गावडे,पवन गावडे, विजय कळमकर,देविदास पवार तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळ,ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्रदादा गावडे मित्र परिवाराने सहकार्य केले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ,विटा ब्लड बँक टीम यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.