March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
     जिल्हा परीषदेचा मानाचा अध्यक्ष चषक पुरस्कार शिरूर तालुक्यातील शिक्रापुर (तालुका शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन प्रशालेस मिळाल्यामुळे तेथील मार्गदर्शक शिक्षकांचा शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठनतर्फे मुख्याध्यापक संतोष विधाटे सर व मार्गदर्शक शिक्षकांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करणेत आला .   

१८०० वर विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेचे सर्वात जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप व गुणवता यादीत झळकतात . येथील शिक्षक स्टाफ जास्तीचे तास घेवून शिकवतात . माजी मुख्याध्यापक संतोष गोसावींचे काळापासून कोयाळी प्रशालेची शैक्षणीक ख्याती आहे, म्हणून पटसंख्या १८०० वर पोचली आहे .

पदवीधर प्राथमीक शिक्षक व केंद्रप्रमुख.रामचंद्र नवले सर यांनी शिक्षकांचे मेहनतीस फळ मिळाल्याचे सांगीतले .शिवदुर्ग प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष पवार यांना शाळेतील शिक्षकांचे या कामाचे कौतुक केले . प्रकाश नरवडे सर यांनी प्रास्ताविक केले . शिक्षक पतसंस्थेचे संचालक अनिल शेळके यांनी शाळा गावा बाहेर असूनही दर्जामुळे इकडे प्रवेशासाठी मुलांचा ओढा असतो सांगून ग्रामस्थांचे शाळेला केलेल्या सहकार्याबदल ऋण व्यक्त केले .मुख्याध्यापक  संतोष विधाटे सर यांनी आभार मानले .