त्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांचे सातत्याने संपर्कात राहिल्याने दि . २६/०७/२०२२ रोजी सायंकाळी १७:०० वा . चे सुमारास पो.स.ई. पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की , इसम अरबाज रशीद खान हा सी. टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको कॉलनी रोड येथे त्याचे सोबत बेकायदेशिर विनापरवाना गावठी पिस्तुल जवळ बाळगुन फिरत आहे . अशी माहिती प्राप्त झाल्याने
पो.नि.सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीस पिस्तुलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस पथकातील पो.स.ई पाटील , पो.कॉ.नेमाने , पो.कॉ. तायडे , पो.कॉ. साळुंके , चालक पो . कॉ . मांगडे यांना बातमी मिळाल्या ठिकाणी पाठविले असता तेथे इसम नामे अरबाज रशीद खान वय २३ वर्ष , रा . बाबुरावनगर , शिरूर , ता . शिरूर , जि . पुणे हा संशयास्पद मिळुन आला त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १ ) २०,००० / – रू . किंमतीचे एक गावठी पिस्तुल २ ) ४०० / – रू . किंमतीचे दोन जिवंत काडतुस असा एकुण २०,४०० / -रु . किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आलेला आहे . तसेच आरोपीस देखील अटक करण्यात आलेली असुन अटक आरोपीकडे गुन्हयाचा अधिक तपास करून गुन्हयात आणखी आरोपींचा सहभाग होतो अगर कसे याबाबत तपास चालु आहे . सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सोो , मा . अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे सेग , पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी सो , शिरूर यांचे मागदर्शना खाली मा . पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत सोो , शिरूर पोलीस ठाणे , पोसई एकनाथ पाटील , पो.कॉ. नेमाने , पो.कॉ. तायडे , पो . कॉ . साळुंके , चालक पो . कॉ . मांगडे यांनी केलेली असुन याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३७ / २०२२ आर्म्स अॅक्ट क . ३ , २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई एकनाथ पाटील हे करीत आहेत .


