March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
       पुणे जिल्ह्यात गायरान जागेवर केलेली  अतिक्रमणे काढण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी नेमल्या तालुका वाईज समित्या.
      माहिती सेवा समितीचे माध्यमातून केलेल्या तक्रारीची घेतली दखल. माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी यासंदर्भात  मा.जिल्हाअधिकारी यांचे कडे तक्रार केली होती  

 पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सरकारी गायरान जागेवर खुप मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे मोठ्या गावांमध्ये तर अनेक पुढार्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत व्यवसाईक दुकाने थाटून लाखो रुपये महिना कमवत आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरे बांधली आहेत,काही ठिकाणी शेती केली जात आहेत महसूल विभाग जानुन बुजुन दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे सर्व अतिक्रमणा बाबत चौकशी करून कारवाई करावी अशाप्रकारची वारघडे यांनी केली होती त्याची दखल घेत मा.जिल्हाआधिकारी  प्रत्येक तालुक्यात चौकशी समिती नेमली व अहवाल मागवला आहे .

   कारवाई होई पर्यंत आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले.