March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                    कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पुलावरील फूटपाथवर टोरंट गॅस कंपनीने मागील अनेक दिवसांपासून अतिक्रमण करून फूटपाथवर मोठी लोखंडी पाइप लाइन टाकून पूर्ण फूटपाथ व्यापला आहे. पायी चालकांना सध्या फूट पाथवरून प्रवास करता येत नसल्याने थेट हायवे रस्त्यावर उतरून पायी प्रवास करावा लागत आहे.यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

                फूटपाथचा वापर न करता थेट रस्त्यावरून प्रवास केल्याने कदाचित पायी चालकांचा यामुळे अपघात झालाच तर या घटनेस जबाबदार कोण असणार?प्रशासन की टोरंट गॅस कंपनी? असा सवाल देखील स्थानिकांकडून उपस्थित केला जात असून लवकरात लवकर ही पाइप लाईन काढून टाकावी व सदर फूटपाथ रस्ता मोकळा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांना होणारे या त्रासाबद्दल भरारी न्यूजने अनेकदा प्रशासनाला जाग येण्यासाठी बातम्या प्रसिद्ध केले आहेत, याचा विचार तातडीने शासनाने करावा तसेच अनेक नियमांचे उल्लंघन करून चाललेले या पाईपलाईनी बद्दल ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे,