कांद्याचा झाला वांदा जुन्नर बाजार समितीत कांद्याच्या भावात 100 रुपयांची घसरण निर्यात बंदी फसवी निवडणुकीपूर्वीच जेएनपीटी बंदरात 400 कंटेनर कांदा अडकला वर्षभरात अनेक वेळा कांदा बंदी उठवल्याचे केंद्र सरकार सांगत असून प्रत्येक वेळेस ही घोषणा फक्त हवेतच राहिलेली असल्याचे मत महाराष्ट्रातील शेतकरी व्यक्त करीत आहे,
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी मुख्य बाजार आवारामध्ये ११३९६ पिशव्यांची आवक झाली असता मागील दोन दिवसाच्या तुलनेत प्रतवारीनुसार चांगल्या कांद्याला 170 ते 200 रुपये इतका भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांच्याकडून बाजारभावाची माहिती मिळाली असून हाच बाजार भाव रविवारी 210 ते 300 रुपये इतका मिळाला होता परंतु आजच्या बाजारभावात शंभर रुपयाची घट झाल्याचे दर्शनात आले आहे,
निवडणूक तोंडावर आली की मतदानाच्या अमिषा पोटी शेतकऱ्यांना आम्ही काहीतरी देतोय असे दाखवून भासवण्याचा प्रयत्न सत्तेत असलेल्या सरकारकडून होत असतो असाच प्रयत्न केंद्र सरकारने आम्ही कांदा निर्यात करीत आहोत असं सांगितले असले तरी प्रत्यक्षात बाकी कांदा निर्यात करताना लागत असलेल्या कायदेशीर त्रुटी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा दोन दिवसापासून जेएनपीटी बंदरात तसाच पडून आहे
दोन दिवसापूर्वी ज्या कांद्याला वाशी मार्केटमध्ये चांगल्या कांद्याला 220 ते 300 रुपये भाव मिळाला परंतु निर्यात करण्यासाठी घेतलेला कांदा कंटेनर मध्ये भरून ठेवला परंतु त्यासाठी कायदेशीर परवानगी नसल्यामुळे ते कंटेनर त्याच ठिकाणी उभे असून त्याचा परिणाम बाजारभावावरती झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि सरकारनी निर्यात बंदी उठवल्याची घोषणा ही फसवी असल्याचे शेतकऱ्यांच्या ध्यानात आले असून हे सरकार शेतकऱ्यांच्या नुस्कानीला सरकार जबाबदार असून सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कांदा निर्यात बंदी खरोखर उठवली आहे का याबाबत पणन अधिकारी त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला अजून त्याबाबतची कुठलीही पत्र प्राप्त झाले नसल्याचे कळले आहे त्यामुळे ही निर्यात बंदी निवडणुकीपूर्वीच सपशेल खोटी ठरली असून याचा फटका मात्र कष्टकरी शेतकऱ्यांनाच बसत आहे.