गेले दहा-बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे महामार्गावर खड्डे पडत आहे. काही दिवसांपूर्वी हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले होते, मात्र आता पावसाळा सुरु झाला असून कारेगाव येथील मुख्य चौकातच महामार्गावर खड्डे पडले आहेत.पावसाच्या जोरामुळे खड्यात पाणी साचले आहे.त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात जोरात आदळून त्यांचे टायर फुटले असून, दुचाकींचे किरकोळ अपघात देखील झाले आहे.राज्य महामार्ग खड्डयांच्या विळख्यात सापडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात येत असुन ही डागडुजी एखाद्या मोठ्या पावसात पुन्हा वाहुन जाणार एवढे माञ निश्चित,
पुणे-नगर महामार्गाची दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना हा विभाग मात्र जाणीवपूर्वक रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली कानाडोळा करताना दिसत असते. पुणे नगर महामार्गावरून लोकप्रतिनिधी, मंत्री व अनेक विभागाचे अधिकारी प्रवास करत असतात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील खड्डे दिसत नाही का, असा सवाल नागरिक करत आहे.


